मुख्य मजकुराकडे जा
लोकमान्य न्यूज – महाराष्ट्राची विश्वसनीय बातमी

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ७५ टक्के अनुदानावर मिळणार कृषी साहित्य; पुणे जिल्हा परिषदेची ५.५० कोटींची योजना

६,२५० शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट; मोटार पंप, पीव्हीसी पाइप, स्प्रे पंप, ताडपत्री आणि भात लावणी यंत्रासाठी ऑनलाइन अर्ज सुरू, ५ डिसेंबर अंतिम मुदत.

Lokmanya newsअद्यतनित: २० नोव्हेंबर, २०२६ रोजी ११:५४ PM वाजता
शेअर करा:
फॉलो करा:

पुणे : शेतीचा वाढता खर्च, महागडी कृषी अवजारे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी लागणारा आर्थिक भार यामुळे अनेक शेतकऱ्यांना आवश्यक साधने खरेदी करणे शक्य होत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी पुणे जिल्हा परिषदेने मोठा दिलासा देणारी योजना सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत २०२६-२७ या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना विविध आधुनिक कृषी अवजारे आणि साहित्य खरेदीसाठी तब्बल ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेसाठी ५.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ६,२५० शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

नेमक्या कोणत्या पाच वस्तूंवर मिळणार ७५ टक्के अनुदान?

जिल्हा परिषद निधीअंतर्गत पाच प्रकारच्या कृषी साहित्याचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

१. ७.५ एच.पी. ओपनवेल मोटार पंपसंच

२. २० एमएम पीव्हीसी पाइप

३. बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रे पंप

४. प्लास्टिक ताडपत्री

५. भात लावणी यंत्र

अर्ज कसा करायचा?

या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकृत योजना संकेतस्थळाला भेट देऊन विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज सादर करावा.

अर्ज करण्याची अंतिम मुदत : ५ डिसेंबर २०२६

योजनेच्या अटी, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अधिक माहितीसाठी संबंधित पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती अमोल नलावडे यांनी केले आहे.

अधिक वाचा
शेअर करा:

वाचकांच्या प्रतिक्रिया

सर्व प्रतिक्रिया प्रकाशनापूर्वी तपासल्या जातात.

अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुमची असू द्या!

जिल्हा परिषद पुणे – आणखी बातम्या

सर्व बातम्या पहा
जिल्हा परिषद शाळेतील २५ विद्यार्थी अमेरिकेत; नासा, स्टॅनफोर्ड अन् गुगलला देणार भेट!
जिल्हा परिषद पुणे

जिल्हा परिषद शाळेतील २५ विद्यार्थी अमेरिकेत; नासा, स्टॅनफोर्ड अन् गुगलला देणार भेट!

२० हजार विद्यार्थ्यांमधून तीन टप्प्यांत निवड; नासा, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल कॅम्पसला भेट देण्याची संधी, दौंडच्या शेलारमेणमाणगावचा सुदर्शन शेलारही अमेरिकेसाठी रवाना.

२० नोव्हेंबर, २०२६

ग्रामसेवकांची आता खैर नाही! जिल्हा परिषद अध्यक्षांचा थेट इशारा; तक्रारींची होणार चौकशी
जिल्हा परिषद पुणे
ब्रेकिंग

ग्रामसेवकांची आता खैर नाही! जिल्हा परिषद अध्यक्षांचा थेट इशारा; तक्रारींची होणार चौकशी

मुळशी तालुक्यातील जांबे ग्रामपंचायतीच्या तक्रारींची प्रशासनाकडून दखल; जिल्ह्यातील ग्रामसेवकांविरोधातील तक्रारी थेट जिल्हा परिषद अध्यक्षांकडे करण्याचे आवाहन.

२० नोव्हेंबर, २०२६