मुख्य मजकुराकडे जा
लोकमान्य न्यूज – महाराष्ट्राची विश्वसनीय बातमी

जिल्हा परिषद शाळेतील २५ विद्यार्थी अमेरिकेत; नासा, स्टॅनफोर्ड अन् गुगलला देणार भेट!

२० हजार विद्यार्थ्यांमधून तीन टप्प्यांत निवड; नासा, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल कॅम्पसला भेट देण्याची संधी, दौंडच्या शेलारमेणमाणगावचा सुदर्शन शेलारही अमेरिकेसाठी रवाना.

Lokmanya newsअद्यतनित: २१ नोव्हेंबर, २०२६ रोजी ४:१४ AM वाजता
शेअर करा:
फॉलो करा:

पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने राबविलेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील २५ विद्यार्थ्यांची अमेरिकेच्या शैक्षणिक दौऱ्यासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना नासा, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल कॅम्पसला भेट देण्याची संधी मिळणार आहे. तब्बल २० हजार विद्यार्थ्यांमधून तीन टप्प्यांत ही निवड प्रक्रिया पार पडली. या दौऱ्यात दौंंड तालुक्यातील शेलारमेणमाणगाव येथील सुदर्शन कल्याणी सोमनाथ शेलार याचाही समावेश आहे.

या दहा दिवसांच्या दौऱ्यात विद्यार्थी वॉशिंग्टन डी.सी., ऑर्लॅंडो आणि सॅन फ्रान्सिस्को येथील विविध वैज्ञानिक व शैक्षणिक संस्थांना भेट देणार आहेत. नासाचे केनेडी स्पेस सेंटर, एअर अँड स्पेस म्युझियम, एम्ब्री-रिडल एरोनॉटिकल युनिव्हर्सिटी, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल कॅम्पसचा या दौऱ्यात समावेश आहे. या भेटींमधून विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्राची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे.

सुदर्शन शेलारच्या यशाचे विशेष कौतुक

दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलारमेणमाणगाव येथील विद्यार्थी सुदर्शन कल्याणी सोमनाथ शेलार याची अमेरिकेच्या या शैक्षणिक दौऱ्यासाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील या संधीपर्यंत मजल मारल्याने शाळा परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.

सुदर्शनसह सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन - सागर शेलार

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची नासासारख्या जागतिक संस्थेला भेट ही अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे. सुदर्शन शेलारसह अमेरिकेच्या शैक्षणिक दौऱ्यासाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा. मोठी स्वप्ने पाहावीत, जिज्ञासा जिवंत ठेवावी आणि यशाची नवी शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण व क्रीडा समिती सदस्य सागर आबा रघुनाथ शेलार यांनी दिल्या.

शेअर करा:

वाचकांच्या प्रतिक्रिया

सर्व प्रतिक्रिया प्रकाशनापूर्वी तपासल्या जातात.

अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुमची असू द्या!

जिल्हा परिषद पुणे – आणखी बातम्या

सर्व बातम्या पहा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ७५ टक्के अनुदानावर मिळणार कृषी साहित्य; पुणे जिल्हा परिषदेची ५.५० कोटींची योजना
जिल्हा परिषद पुणे

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ७५ टक्के अनुदानावर मिळणार कृषी साहित्य; पुणे जिल्हा परिषदेची ५.५० कोटींची योजना

६,२५० शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट; मोटार पंप, पीव्हीसी पाइप, स्प्रे पंप, ताडपत्री आणि भात लावणी यंत्रासाठी ऑनलाइन अर्ज सुरू, ५ डिसेंबर अंतिम मुदत.

२० नोव्हेंबर, २०२६

ग्रामसेवकांची आता खैर नाही! जिल्हा परिषद अध्यक्षांचा थेट इशारा; तक्रारींची होणार चौकशी
जिल्हा परिषद पुणे
ब्रेकिंग

ग्रामसेवकांची आता खैर नाही! जिल्हा परिषद अध्यक्षांचा थेट इशारा; तक्रारींची होणार चौकशी

मुळशी तालुक्यातील जांबे ग्रामपंचायतीच्या तक्रारींची प्रशासनाकडून दखल; जिल्ह्यातील ग्रामसेवकांविरोधातील तक्रारी थेट जिल्हा परिषद अध्यक्षांकडे करण्याचे आवाहन.

२० नोव्हेंबर, २०२६